विषमुक्त (Residue Free) माठ लागवड तंत्रज्ञान
✅ एकदा लागवड केल्यानंतर सात - आठ कापण्या घेता येतात
✅ तिनही हंगामामध्ये लागवड करता येते
✅ पावसाळ्यातील लागवड हलक्या, उताराच्या, निचऱ्याच्या जमिनीवर करावी
✅ एकरी दोन ते अडीच किलो बियाणे पेरणीसाठी पुरेशी असते
✅ को - 1, को - 2, को 3, केरळ - 1 , दुरंगी माठ, हिरवा माठ या सुधारित जातीची लागवड करावी
✅ बिजप्रक्रिया (ट्रायकोडर्मा पीएसबी, केएमबी) यांचा वापर करून पेरणी करावी
✅ लागवड ही पेरणी करून करावी, फोकून नव्हे
✅ पिक बेडवरच राहील याची दक्षता घ्यावी
✅ उत्कृष्टपणे तण नियंत्रणासाठी पेरणी झाल्याबरोबर गोल ची फवारणी करावी
✅ मिनी स्प्रिंकलर किंवा रेन पाईपने पाणी व्यवस्थापन करावे
✅ ट्रायकोडर्मा, सुडोमोनास फ्लूरोसन्स, पॅसिलो, मेटारायझम या जैविक खतांचा व कीडनाशकांची पावडर 1 किलो प्रति एकर
✅ पाण्याच्या पुढे जमिनीवर विस्कटून द्यावी
✅ 19:19:19 ची फवारणी करावी दर आठवड्याला करावी
एकात्मिक कीड व रोग नियंत्रणासाठी जैविक कीडनाशकाची (लेक्यानीसिलियम, बिव्हेरिया, नोमुरिया, बॅसिलस सबटीलीस, लॅक्टोबॅसिलस ) यांची फवारणी करावी
✅ 5% निंबोळी अर्काची दर दहा दिवसांनी फवारणी करावी
✅ विषमुक्त पालेभाज्या उत्पादनासाठी शिफारस असलेली किडनाशके, शिफारस केलेल्या मात्रेतच फवारावीत