उच्च उत्पादनासाठी कमी खर्चातील लेट्युस लागवड पद्धत

  • ✅  हे एक परदेशी पालेभाजी पिक असून याचा वापर मुख्यत्वे सॅलड, पिझ्झा बर्गर व रॅप इत्यादी मध्ये केला जातो
  • ✅  लागवडपूर्वी पिक विक्रीबाबतची संपूर्ण माहिती घ्या
  • ✅  नियमितपणे अर्धा 5 ते 10 गुंठे क्षेत्रावर लागवड करावी जेणेकरून मागणीप्रमाणे पुरवठा करणे शक्य होईल
  • ✅  रोपे वाढीसाठी 20 अंश सेल्सिअस ते 25 अंश सेल्सिअस तापमान व गड्डा तयार होण्यासाठी 15 - 20 अंश सेल्सिअस तापमान या पिकास मानवते
  • ✅  पावसाळ्यात हलक्या ते मध्यम रेती मिश्रित पोयट्याची परंतु उत्तम निचऱ्याच्या जमिन व रब्बी आणि अर्ली उन्हाळी साठी मध्यम ते भारी जमीन लागवडीसाठी निवडावी
  • ✅  जास्त पावसापासून पिक वाचवण्यासाठी रुंद वरंबा सरी पद्धतीवर पिकाची पेरणी करावी
  • ✅  पेरणीसाठी बाजारात मागणी असणाऱ्या संकरित वाणाचा वापर करावा
  • ✅  आपल्याकडे आईसबर्ग, बटर हेड, रोमानी, लुज लेट्युस स्टेम लेट्युस या प्रकाराची मागणी जास्त आहे
  • ✅  बाजारातील मागणीप्रमाणे लेट्युसच्या प्रकारानुसार वाणाची निवड करावी
  • ✅  लागवडीचे वेळी रोपाचे वय 20 ते 25 दिवसाचे असावे व त्यास 5 ते 6 निरोगी पाने असावीत आणी रोपांची उंची 12 ते 15 सेंटीमीटर असावी
  • ✅  सरासरी एकरी 25,000 ते 30,000 रोपे लावली जातात
  • ✅  लागवडीपूर्वी रोपास प्रक्रिया (ट्रायकोडर्मा पीएसबी, केएमबी) करावी
  • ✅  एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करावे ज्यामध्ये शेणखत, दाणेदार खत,लिंबोळी पेंड, सिंगल सुपर फॉस्फेट,सूक्ष्मलद्रव्य ग्रेड एक किंवा चिलटेड मॉलिब्डेनम व बोरॉन यांचा वापर करावा
  • ✅  उत्कृष्टपणे तण नियंत्रणासाठी पेरणी झाल्यावर लगेच पेंडिमिथिलिन या रासायनिक तणनाशकाची फवारणी करावी
  • ✅  उगवणपश्चात तणनाशक अदामा अजिल किंवा टरगा सुपर यांचा पिक 20 ते 21 दिवसाच्या असताना करता येतो
  • ✅  ठिबक, स्प्रिंकलर किंवा रेन पाईपने पाणी व्यवस्थापन करावे
  • ✅  ट्रायकोडर्मा सुडोमोनास फ्लूरोसन्स, पॅसिलो, मेटारायझम या जैविक खतांचा व किडनाशकांची पावडर 1 किलो/ लिटर प्रति एकर ठिबक मधून किंवा पाण्याच्या पुढे जमिनीवर विस्कटून द्यावी
  • ✅  पिक वाढीच्या अवस्थेनुसार पाण्यात विरघळणाऱ्या खताची फवारणी दर 8-10 दिवसांनी करावी
  • ✅  एकात्मिक किड व रोग नियंत्रणासाठी जैविक किडनाशकाची (लेक्यानीसिलियम , बिव्हेरिया, नोमुरिया, बॅसिलस सबटीलीस, लॅक्टोबॅसिलस) यांची फवारणी करावी
  • ✅  5% निंबोळी अर्काची दर 10 दिवसांनी फवारणी करावी
  • ✅  विषमुक्त पालेभाज्या उत्पादनासाठी शिफारस असलेली किडनाशके, शिफारस केलेल्या मात्रेतच फवारावीत
  • logo

    'Shri', Plot no.4, Sr.No. 129/1, Chakankar Mala, Shrusti Park Opp. Anurao heights, Baner Pune-45
    +91 9881022999

    website counter