राजगिरा - सुपरफुड, सुधारित लागवड तंत्रज्ञान

  • ✅  अत्यंत बहुगुणी आणि पौष्टिक म्हणून या पिकास " सुपरफुड " म्हणतात
  • ✅  खरिप आणि रब्बी हंगाम मध्ये लागवड करता येते परंतु रब्बी हंगामातील लागवड फायदेशीर ठरते
  • ✅  लव्हाळा तणाचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकरी राजगिऱ्याची लागवड करतात
  • ✅  मध्यम ते भारी काळी कसदार व पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी
  • ✅  धान्यासाठी फुले कार्तिकी, सुशीला, शंकर या सुधारित वाणाची लागवड करावी
  • ✅  भाजीसाठी पुसा किरण,पुसा 1, पुसा लाल, अप्सरा, अरुण इत्यादी वाण लागवडीसाठी उपलब्ध आहेत
  • ✅  राजगिरा बियाणे अत्यंत लहान व नाजूक असल्यामुळे वाळू किंवा जाड रव्यामध्ये मिसळून पेरणी करावी
  • ✅  एकरी 1 किलो बियाणे पुरेशे असते
  • ✅  45 ×15 सेंटिमीटर लागवडीचे अंतर ठेवावे
  • ✅  एकरी 24 किलो नत्र 8 किलो स्फुरद आणि 8 किलो पालाश आणी 8 किलो गंधक पेरणी करताना बियाखाली द्यावे
  • ✅  10- 15 दिवसांनी पहिली व 25 ते 30 दिवसांनी दुसरी विरळणी करावी
  • ✅  रब्बी हंगामामध्ये 5 -6 पाण्याच्या पाळ्या या पिकास द्याव्या लागतात
  • ✅  पाने खाणाऱ्या अळ्या, मावा, पांढरी माशी आणि फुलकिडे या किडी तर पानावरील डाग, मुळकुज, बुंधा कुज व भुरी या रोगाचा प्रादुर्भाव या पिकावर होतो त्यासाठी एकात्मिक कीड व रोग नियंत्रणाचे उपाय करावेत
  • ✅  ११० ते १२० दिवसात पिक पक्व होते, काढणीस उशीर केल्यास दाणे गळून पडतात
  • ✅  छोटासा घरगुती प्रक्रिया उद्योग उभारल्यास वर्षभर रोजगार तथा उत्पन्नाचे साधन होते
  • logo

    'Shri', Plot no.4, Sr.No. 129/1, Chakankar Mala, Shrusti Park Opp. Anurao heights, Baner Pune-45
    +91 9881022999

    website counter